PHOTO : आता बसमधून प्रवास करताना पुस्तक वाचण्याची सुविधा, नवी मुंबईच्या बसेसमध्ये ग्रंथालय
विविध उपक्रम राबवण्यात नवी मुंबई महानगरपालिका कायम पुढे असते. अशात आता पालिकेने लेट्स रीड फाउंडेशनच्या सहकार्याने एका अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया उपक्रमान्वये नवी मुंबई मनपा परिवहन उपक्रमाच्या बसेसमध्ये आता ग्रंथालयाची स्थापना करण्यात येणार आहे.
या ग्रंथालयामध्ये इंग्रजी, मराठी भाषांमधील नामवंत लेखकांची पुस्तके ठेवण्यात येणार आहे. प्रवास करणाऱ्यां प्रत्येकाला वाचण्याकरता ही पुस्तकं उपलब्ध असणार आहेत
नागरिकांमध्ये वाचन संस्कृती रुजावी, प्रवास करताना नागरिकांनी त्यांचा वेळ मोबाईलमध्ये न घालवता पुस्तक वाचण्यात घालवावा यासाठी ही सुविधा करत एक उत्तम सवय नागरिकांना लागावी या दृष्टीने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
परिवहन उपक्रमाच्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी या ग्रंथालयाचे उदघाटन करण्यात आले आहे. यावेळी नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते.