In Pics : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचं केंद्र सिल्वर ओक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Apr 2022 06:07 PM (IST)
1
दक्षिण मुंबईतील भुलाभाई देसाई रोडवरील सिल्व्हर ओक बंगला हा महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचं केंद्र आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
'सिल्व्हर ओक' हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील बंगल्याचे नाव आहे.
3
'सिल्व्हर ओक' हे एकाचे वृक्षाचे नाव आहे. या वृक्षाचा वापर विविध गोष्टींसाठी केला जातो. त्यामुळेच या बंगल्याचे नाव 'सिल्व्हर ओक' असे ठेवण्यात आले आहे.
4
शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानात घुसून एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक आंदोलन केले आहे.
5
आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल केल्याने याचे गंभीर पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
6
एसटी महामंडळाचे विलीनीकरण पूर्णपणे करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा एक गट आज सिल्वर ओक परीसरात आक्रमक झाल्याचे दिसून आले.