Aasavari Joshi : अभिनेत्री आसावरी जोशींनी हातावर बांधलं घड्याळ! राष्ट्रवादीत प्रवेश
प्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी (Aasavari Joshi) यांनी आज (7 एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आसावरी जोशी यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.
'कलाकारांचे आणि जनतेचे प्रश्न सोवडण्याचा प्रयत्न करणार', असं त्यांनी यावेळी सांगितलंय.
1986 मध्ये आलेल्या 'माझं घर, माझा संसार' या मराठी चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं
2001 मध्ये दुरचित्रवाणीवरील 'ऑफिस-ऑफिस' या हिंदी मालिकेतील त्यांच्या अभिनयाची मोठी चर्चा झाली होती.
त्यांनी 'सुवरी' या नाटकात अभिनय केला होता. त्यांचा पहिला बॉलीवूड चित्रपट 'प्यार जिंदगी है' हा होता.
जोशी यांनी 1989 मध्ये 'धाम धूम' आणि 'एक रात्र मंतरलेली' या चित्रपटांत काम केले.
तर 1991 मध्ये ‘गोडी गुलाबी’ या मराठी चित्रपटातही त्यांनी अभिनय केला आहे. आसावरी जोशी यांची 1993 मध्ये दुरदर्शनवर आलेली मालिका 'जबान संभालके' मालिकेतील कन्याकुमारीची भूमिका फारच गाजली होती.