In Pics : उत्तर अमेरिकेच्या रेड नेक फॅलेरॉप या पक्षाचे पालघरमध्ये दर्शन
पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर आणि उथळ पाणथळ भागात दरवर्षी विविध देशी विदेशी पक्षी पाहायला मिळतात. साधारपणे थंडीच्या मोसमात अशा विदेशी पक्षांच्या स्थलांतराला सुरुवात होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहजारो किलोमीटरचा प्रवास करत हे पक्षी विविध देशांत भ्रमंती करत असतात. थंडी कमी होताच पुन्हा हे पक्षी आपल्या मायदेशी परतण्यासाठी परतीचा प्रवास करतात.
साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. अशाच परतीच्या प्रवासात असलेल्या उत्तर अमेरिकेतील रेड नेक फॅलेरॉप या पक्षाचे पालघरमध्ये दर्शन झाले आहे.
एरवी ह्या पक्षाची पिसे ही काळ्या आणि पांढऱ्या रंगाची दिसतात. पण जेव्हा हा पक्षी विणीचा हंगामात येतो, तेव्हा ह्या पक्षाच्या पिसांना लाल रंग होतो.
छातीवरील पिसांना देखील लाल रंग येण्यास सुरुवात होते. विणीच्या हंगामात हा पक्षी पालघरमध्ये प्रथमच दिसला आहे.
या पक्षाला पक्षी निरीक्षक प्रवीण बाबरे यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे.
याआधी हा पक्षी पालघर जिल्ह्यातील चिंचणीमधील उथळ पाणथळ भागात 30 ऑक्टोबर 2016 रोजी त्याच्या नेहमीच्या हंगामात पहिला गेला होता. विणीच्या हंगामात हा पक्षी अधिकच आकर्षक दिसत असल्या कारणामुळे ह्या पक्षाला पाहण्यासाठी पक्षी मित्र हजेरी लावत आहेत.