In Pics : मुंबईकरांचा 'मास्कमुक्तीचा' पहिला दिवस कसा होता?
मराठी नववर्षाचं स्वागत यंदा धुमधडाक्यात होणार आहे. नववर्षात महाराष्ट्र नव्या उमेदीनं सुरुवात करणार आहे. कारण तब्बल 736 दिवसांच्या कोरोना निर्बंधांच्या बेड्या तोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमास्कमुक्ती झाल्यानंतर कॉलेज परिसरात , कॉलेज कट्ट्यावर होणारी विद्यार्थ्यांची घुसमट आता एकदाची थांबली आहे. आता महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मास्क न घालता मुक्तपणे फिरता येणार आहे
उद्याच्या गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात नागरिकांची खरेदीसाठी मोठी रेलचेल बघायला मिळत आहे
मुंबईतील लोकल प्रवाशांनाही राज्य सरकारने दिलासा दिलाय. लोकल प्रवासासाठी असलेली दुहेरी लसीकरणाची अट मागे घेण्यात आलीय.
भाविकांनाही सरकारने आनंदाची बातमी दिलीय. निर्बंध उठल्याने मंदिरांमधील दर्शनासाठी असलेले नियम हटवले जाणार आहेत. त्यामुळे दर्शनपास रांगेतून भाविकांची सुटका होणार आहे.