PHOTO : Famous temples of Mumbai : मुंबईतील प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरे!

Famous Temples Of Mumbai: मुंबईला स्वप्ननगरी म्हटलं जातं. देशातील आर्थिक राजधानी आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेलं हे शहर आहे. मुंबईत जशा मोठमोठ्या इमारती, मॉल्स आहेत तसेच या शहरात अनेक प्राचीन मंदिरं देखील आहेत. देशातूनच नाही तर परदेशातूनही अनेक जण इथे दर्शनासाठी येतात. जाणून घेऊया या मंदिरांबाबत....
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबा देवी मंदिर - दक्षिण मुंबईत भुलेश्वर परिसरातले मुंबादेवी मंदिर प्रसिद्ध आहे. मुंबादेवी या देवीच्या नावावरुन शहराला मुंबई हे नाव पडले. मंदिराचा इतिहास जवळपास 400 वर्षांचा आहे. या मंदिराची स्थापना सर्वात आधी मूळ मुंबईकर असलेल्या मच्छीमारांनी (कोळी बांधव) केली, असं सांगितलं जातं.

बाबुलनाथ मंदिर - गुजराती समुदायाने हे मंदिर बांधलं आहे. भगवान शंकराचं हे मंदिर गिरगाव चौपाटीजवळच्या एका टेकडीवर वसलं आहे. 1890 मध्ये हे मंदिर बांधलं होतं.
इस्कॉन मंदिर - हे मंदिर भगवान कृष्णाला समर्पित आहे. भव्य मंदिर संगमरवर आणि काचेपासून बनलं आहे, जे मुंबई उपनगरातील जुहू बीचपासून काही अंतरावर आहे.
सिद्धिविनायक मंदिर - हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे. इथे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हे गणपतीचं मंदिर आहे. 1801 मध्ये लक्ष्मण विठू पाटील आणि देऊबाई पाटील या दाम्पत्याने हे बनवलं होतं. या दाम्पत्याला स्वत:चं अपत्य नव्हतं, म्हणून त्यांनी मंदिर बनवण्याचा निर्णय घेतला, असा म्हटलं जातं. इथली गणेश मूर्ती स्वयंभू असल्याचं म्हटलं जातं.
थिरुचेम्बुर मुरुगन मंदिर - हे दाक्षिणात्य शैलीचं मंदिर आहे. भगवान मुरुगन यांचं हे मंदिर आहे. मुंबईतील चेंबुर पश्चिम परिसरातील एका छोट्या टेकडीवर हे मंदिर आहे.
वाळकेश्वर मंदिर - बाण गंगा मंदिर अशीही या मंदिराची ओळख आहे. दक्षिण मुंबईतील मलबार हिल्सजवळ हे मंदिर आहे. मंदिराजवळ छोटंसं तलाव आहे, ज्याला बाण गंगा टँक म्हटलं जातं. अमावस्या आणि पूर्णिमेला या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. (PHOTO : Ashutosh Bijoor @bijoor)