Girgaon Shobha Yatra : मुंबईच्या गिरगावमध्ये शोभायात्रेत महिलांची बुलेटस्वारी!
आज राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह दिसून आला. मराठी नववर्ष, गुढीपाडव्या निमित्ताने राज्यात ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. (Photo : Ujwal Puri)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईसह ठाणे, पुणे, कोल्हापूर,नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या अनेक शहरांमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह दिसून आला. (Photo : Ujwal Puri)
गिरगावच्या शोभायात्रेचे सुंदर फोटो टिपले आहेत छायाचित्रकार उज्वल पुरी यांनी
राज्याच्या विविध भागात मिरवणूक, पारंपरिक वेशभूषा करत गुढीपाडवा साजरा करण्यात आला. (Photo : Ujwal Puri)
काही ठिकाणी राजकीय नेते मंडळी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी शोभायात्रेत हजेरी लावली. (Photo : Ujwal Puri)
मुंबई, ठाणे, डोंबिवली येथील शोभायात्रेत तरुणांसह आबालावृ्द्धांनी हजेरी लावली होती. (Photo : Ujwal Puri)
मुंबईतील गिरगाव, लालबाग, दादर, चेंबूर, गोरेगाव आदी विविध ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. (Photo : Ujwal Puri)
या शोभायात्रेत मल्लखांब प्रदर्शन, पुणेरीसह विविध ढोल ताशा पथके, महिलांचे विशेष झांजपथक, विविध शोभायात्रा रथांचा सहभाग होता. (Photo : Ujwal Puri)
गिरगावच्या फडके गणेश मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात झालीये. 22 फुटांची गुढी उभारण्यात आली. (Photo : Ujwal Puri)
गिरगाव मध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी मराठमोळ्या पेहरावात महिलांची बुलेटस्वारी लक्षवेधक ठरते (Photo : Ujwal Puri)
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील महिलांची बुलेटस्वारी चर्चेचा विषय ठरली (Photo : Ujwal Puri)
पारंपारिक पोशाख परिधानकरुन शोभायात्रेत महिला बुलेटवर स्वार (Photo : Ujwal Puri)
सनातन धर्मानुसार हिंदू नववर्ष चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला साजरे केले जाते. याला गुढीपाडवा (Gudi Padwa 2023) असेही म्हणतात. (Photo : Ujwal Puri)
यामागे एक वैज्ञानिक दृष्टीकोनही आहे. यावेळीशरद ऋतूनंतर वसंत ऋतू सुरु होतो. झाडांना कोरड्या पानांच्या जागी नवीन हिरवी पाने येऊ लागतात. (Photo : Ujwal Puri)
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, भगवान ब्रह्मदेवाने या तिथीला विश्वाची निर्मिती केली. यामुळेच सनातन धर्मात दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला नववर्ष साजरे केले जाते. (Photo : Ujwal Puri)
त्याचबरोबर काही लोक या दिवशी कडुलिंबाची पानेही खातात. यामागची धारणा अशी आहे की, यावेळी निसर्गात बदल होत असतो, त्यामुळे कडुलिंबाची कोवळी पाने खाल्ल्याने रक्त शुद्ध होते. रोगांच्या संसर्गापासून शरीराचे संरक्षण होते आणि शरीर आतून मजबूत होते. (Photo : Ujwal Puri)