Alphonso Mango : नवी मुंबई एपीएमसीमध्ये हापूस आंब्याच्या 65 हजार पेटींची आवक, दर उतरले
गुडीपाढव्याच्या मुहूर्तावर नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरवर्षी पेक्षा या वर्षी गुडीपाढव्याला होणारी आवक जास्त असल्याने आंब्याचे दर सुद्धा खाली आले आहेत.
सध्या दिवसाला 60 ते 65 हजार हापूस आंब्याच्या पेट्या एपीएमसी मार्केटमध्ये येत आहेत.
यामध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून साधारण 45 हजार हापूस पेटी येत असून 15 ते 20 हजार पेट्या कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेशमधून दाखल होत आहेत.
आंबा जास्त येऊ लागला असल्याने दर सुद्धा सध्या कमी झालेले आहेत.
पिकलेला हापूस आंबा 600 ते 1600 रुपये डझन विकला जात असून हिरवा आंबा 400 ते 1 हजार रुपयाने विकला जात आहे.
दरम्यान राज्यात तीन ते चार दिवस अवकाळी पाऊस पडत असला तरी कोकणात तो पडला नसल्याने आंब्यावर याचा परिणाम झालेला नाही.
या वर्षी मार्च महिन्यात मोठी आवक असली तरी एप्रिलमध्ये हापूस आंब्याची आवक कमी राहिल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
यंदा कोकणातून गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला नवी मुंबईतील वाशी मार्केटमध्ये जाणाऱ्या पेट्यांची संख्या वाढली आहे.