Gudi padwa 2021 | .... आठवणी गुढीपाडव्यानिमित्त निघणाऱ्या गिरगारवातील शोभायात्रेच्या
गुढी पाडवा म्हटलं की काही ठराविक गोष्टींचा, ठिकाणांचा उल्लेख झाल्यावाचून राहत नाही. पाडव्याचा उच्चार जरी झाला तरी, लगेचच डोळ्यांसमोर उभा राहतो तो म्हणजे मुंबईतील गिरगाव येथील पाडवा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठी नववर्षाच्या निमित्तानं येथे निघणाऱ्या शोभायात्रेला हजारोंच्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती असते. गिरगावातील पाडव्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक पारंपरिक वेशभूषेमध्ये हजर असतात.
मागील वर्षी कोरोनामुळं पाडव्याच्या उत्साहावर सावट आणलं आणि यंदाही परिस्थिती बदलली नाही.
असं असलं तरीही पाडव्याच्या निमित्तानं गिरगावातील 2019च्या गुढी पाडवा शोभायात्रेची ही छायाचित्र खास तुमच्यासाठी.
मराठमोळ्या संस्कृतीची शान जपताना सणाला कुठेही गालबोट लागणार नाही आणि पावलोपावली जनजागृती कशा पद्धतीनं करता येईल, यावर गिरगावच्या पाडव्यात कायम लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे.
इथं निघणारी ध्वज पथक, ढोलताशा पथकांची रॅली या शोभायात्रेची मुख्य आकर्षण.
बुलेटवरुन निघणाऱ्या नऊवारीतील महिला जणू एखाद्या रणरागिणीच्याच आवेगात इथं शोभायात्रेत सहभागी होतात.
उत्सवाचं एक वेगळं रुप गुढी पाडव्याच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळतं. पण, अनेकांसाठीच हा गिरगावचा पाडवा म्हणजे सर्वकाही.
असा हा सण, ही शोभायात्रा यांचं कायम दिसणारं स्वरुप यंदाही पाहता येणार नाही.
पण, एका सकारात्मकतेनं पुढच्या वर्षी गुढी पाडवा द्विगुणित उत्साहात साजरा करुन असाच निर्धार सध्या सर्वजण करत आहेत.