PHOTO : ग्रँड हयातच्या कॉन्सर्टमध्ये स्टार किड्सची हजेरी; कॅमेरा चुकवून जातानाचे फोटो व्हायरल
बॉलिवूडमध्ये सारा अली खान आणि जान्हवी कपूर या दोघींच्या मैत्रिचे किस्से आपण ऐकतोच. दोघी अनेकदा एकत्र दिसून येतात. अशातच रविवारी सारा आणि जान्हवीसोबत इब्राहिम अली खानही दिसून आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील एका कॉन्सर्टनंतर तिघांनाही एकत्र स्पॉट करण्यात आलं. पॅपाराजींनी या तिघांना आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, हे तिघं लग्जरी गाड्यांमधून नाहीतर, चक्क टॅक्सीमधून घरी चालले होते.
मुंबईतील टॅक्सीमध्ये तिघंही सर्वांची नजर चुकवत जाताना दिसले.
साधारणतः सारा मीडिया प्रेंडली असल्याचं पाहायला मिळतं. पण काल रात्री मात्र कॅमेऱ्याची नजर चुकवत हे तिघंही टॅक्सीतून घाईघाईत जाताना दिसले.
जान्हवी कपूरही मीडियापासून दूर राहत असल्याचं पाहायला मिळालं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ग्रँड हयातमध्ये कॅनेडियन रॅपरच्या कार्यक्रमाला शेकडो लोकांनी उपस्थिती लावली होती. सोशल डिस्टन्सिंग तर सोडा यावेळी एकाच्याही चेहऱ्यावर मास्क दिसत नव्हता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ग्रँड हयात हॉटेलमधल्या कॉन्सर्टमध्ये अभिनेत्री सारा अली खान, तिचा भाऊ इब्राहिम अली खान, जान्हवी कपूर, तसंच सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही मंडळी हजर होती. त्यांना कॅमेऱ्यानं कैद केलं आहे.
खरं तर सेलिब्रिटींना तरुणाई फॉलो करते. सेलिब्रिटींनी कोणत्या कार्यक्रमाला हजेरी लावावी हा त्यांचा खासगी प्रश्न आहे. मात्र कोरोनाच्या संकटात सोशल डिस्टन्सिंगचं पालन न केल्यानं ही स्टारमंडळी टीकेचे धनी ठरताहेत.