Maha Beach Clean Up : मनसेकडून सागरी किनारा स्वच्छता मोहीम, अमित ठाकरेंचा सक्रिय सहभाग
मनसेकडून सागरी किनारा स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातल्या ४० सागरी किनाऱ्यावर ही स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.
जुहू आणि वर्सोवा बीचवर मनसेकडून पोस्टर्स आणि झेंडे लावण्यात आले आहे.
सोबतच मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते, वर्सोवा परिसरातील नागरिकांची ह्या मोहीमेला हजेरी बघायला मिळाली.
मनसे कार्यकर्त्यांकडून दुपारी १ वाजेपर्यंत वर्सोवा किनारपट्टी भागातील २ किलोमीटरपर्यंतचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे.
यावेळी नागरिकांकडून समुद्र किनाऱ्याजवळील साधारणपणे १० बॅग्ज एवढा कचरा काढण्यात आला आहे.
आरे जंगल वाचवण्याचा श्रेय शिवसेना घेते पण खरा श्रेय हे जनतेची आहे. आरेचं जंगल शिवसेनेमुळे नाही तर जनतेमुळे वाचलं असे मत मनसे नेते अमित ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. एबीपी माझाशी ते बोलत होते.
सरकार आणि मुंबई महापालिकेकडे कामकरण्याची इच्छाशक्ती नसल्याचा नसल्याचा आरोप मनसे (MNS) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी केला आहे.
आरे जंगल वाचवण्याचा श्रेय शिवसेना घेते पण खरा श्रेय हे जनतेची आहे. आरेचं जंगल शिवसेनेमुळे नाही तर जनतेमुळे वाचलं असे मत मनसे नेते अमित ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.