गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या गाडीचा अपघात, तिघे गंभीर जखमी !
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
03 Dec 2024 01:01 PM (IST)
1
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गोव्यातील म्हापसा जवळील करासवाडा येथे उभ्या कंटेनरला मागून येणाऱ्या पर्यटकांच्या गाडीने पहाटे धडक दिल्याने साताऱ्यातील 6 पर्यटक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यांपैकी तिघांवर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात मध्ये उपचार सुरू आहेत.
3
साताराहून 6 मित्र गोव्यात फिरायला आले असता म्हापसा जवळील करासवाडा येथे उभ्या कंटेनर पाठीमागुन धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.
4
गाडीचा चालक गाडीमध्ये अडकला होता मात्र अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होत कटरच्या साहाय्याने दरवाजा कट करून चालकाला बाहेर काढले.
5
जखमी पर्यटकांना बाहेर काढले तर गंभीर जखमी असलेल्या तिघांना उपचारांसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे.
6
गोवा पोलीस अपघाताचा तपास करीत आहे.