PHOTO : मुंबईतील मानाचा पहिला गणपती 'मुंबईचा राजा' विसर्जनासाठी मार्गस्थ
देशभरात प्रसिद्ध असलेला गणेशगल्लीचा गणपती म्हणजेच, मुंबईच्या राजाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक गिरगावच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे.
वाजतगाजत मुंबईच्या राजाची मिरवणूक निघाली आहे.
भक्तांचा उत्साह पाहायला मिळत आहे.
मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीची आरती पार पडली.
मुंबईचा राजा अर्थात गणेशगल्लीच्या राजाचं विश्वकर्माचं रुप पाहण्यासाठी भक्तांनी गर्दी केली आहे.
गणेशगल्लीत काशीविश्वनाथाचं मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती.
गेल्या 10 दिवसांत लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळानं साकारलेला आकर्षक देखावा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये उत्साहाच वातावरण आहे.
मुंबईच्या राजाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांनी लालबागमध्ये गर्दी केली आहे.