Ganeshostav 2023 : आकर्षक मूर्ती, सुंदर देखावे आणि बाप्पाचा पाहुणचार; मुंबईचा राजा, गिरगावचा राजा आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीचा थाट

तर मुंबईतील प्रतिष्ठित गणपतीचे प्रथम दर्शन रविवार (17 सप्टेंबर) रोजी झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईतील मानाचा पहिला गणपती म्हणजेच गणेश गल्लीतील मुंबईचा राजाचा मुखदर्शन सोहळा पार पडला.

यंदा मुंबईच्या राजाच्या दरबारात शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा साकार करण्यात आला आहे.
याचं एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे यासाठी थेट रायगडावरुन माती आणून तिचं पूजन करण्यात आलं आहे.
पर्यावरण पूरक गणपती म्हणून ख्याती मिळवलेल्या गिरगावच्या राजाचा (Girgaoncha Raja) मुखदर्शन सोहळा रविवार (17 सप्टेंबर) रोजी पडला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी काय केले असतं अशा संकल्पनेतून विविध चित्र या मंडळांनी मंडपात लावली आहेत.
गिरगावच्या राजाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही पूर्ण मूर्ती शाडूच्या मातीची असते. त्यामुळे पर्यावरणपूरक गणपती म्हणून या गणपतीची विशेष ख्याती आहे.
चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शानासाठी भक्तांची मोठी गर्दी असते. याच चिंचपोकळीच्या चिंतामणीचा प्रथम दर्शन सोहळा रविवार (17 सप्टेंबर) रोजी पार पडला.
यंदा मंडळाकडून राम मंदिराचा देखावा सादर करण्यात आला आहे.
तर बाप्पाची मूर्ती देखील रामाच्या अवतारात आहे. बाप्पाच्या शेजारी लक्ष्मण आणि सीता आहेत. तर हनुमान देखील बाप्पाच्या मुर्तीसोबत आहे.