Mumbai: 86 वर्षांपूर्वी सुरू झालेली डबल डेकर बस इतिहासात जमा; मुंबईकर भावुक, पाहा फोटो
Double Decker Bus: मुंबईची ओळख समजल्या जाणाऱ्या बेस्टच्या जुन्या डबलडेकर बस सेवेतून निवृत्त झाल्या. बेस्टच्या जुन्या डबल डेकर बसेसची सेवा 15 सप्टेंबरपासून बंद करण्यात आली, यावेळी मुंबईकर भावुक झाले.
Mumbai Double Decker Bus
1/10
मुंबईची ओळख असणारी जुनी डबल डेकर बस सेवेतून निवृत्त झाली. 15 सप्टेंबरपासून डबल डेकर बस बंद करण्यात आल्या, यावेळी अनेक मुंबईकर या बसला निरोप देण्यासाठी उपस्थित होते.
2/10
15 सप्टेंबरला डबल डेकर बसला निरोप देण्यासाठी अनेक मुंबईकर मरोळ बस डेपोत उपस्थित होते. अंकुर नावाच्या डबल डेकर बसच्या चाहत्याने ही खास टॉय बस बनवून आणली होती. यावेळी अंकुरने म्हटलं, हा क्षण त्याच्यासाठी खूप भावनिक आहे कारण त्याने आपलं संपूर्ण आयुष्य या बसमधून प्रवास केला आहे. याच कारणामुळे तो गेल्या तीन दिवसांपासून दररोज येत असून त्याने यावेळी खास टी शर्ट देखील बनवून घेतलं होतं.
3/10
कंडक्टर सचिन वाघमारे यांनी सांगितलं की, गेल्या 40 वर्षांपासून ते बेस्टच्या डबल डेकरमध्ये बसत होते. कंडक्टर नसतानाही ते प्रवासी म्हणून डबल डेकरच्या वरच्या सीटवर बसायचे.
4/10
डबल डेकर बस सेवेतून निवृत्त होत असताना शेवटच्या दिवशी अनेक नागरिक आपल्या मुलांना घेऊन बसमधून प्रवास करण्यासाठी आले होते. यानंतर त्यांच्या मुलांना या बसचा अनुभव घेता येणार नसल्याने त्यांनी मुलांना आणलं असल्याचं सांगितलं.
5/10
मुंबईत 1937 मध्ये डबल डेकर बसची सुरुवात झाली, 86 वर्ष या बसने प्रवाशांना सुखकर प्रवासाचा आनंद दिला. सध्या बेस्टच्या ताफ्यात केवळ 3 डबल डेकर ओपन डेक बस आणि 7 साध्या डबल डेकर बस उरल्या होत्या.
6/10
अंधेरी डेपो, मरोळ डेपोमध्ये अनेक नागरिक बससोबत शेवटचा फोटो काढत होते.
7/10
साध्या डबल डेकर बस 15 सप्टेंबरपासून सेवेतून निवृत्त झाल्या आहेत, तर मुंबई दर्शन घडवणाऱ्या ओपन डेक डबल डेकर बस 5 ऑक्टोबरनंतर सेवेतून पूर्णत: बंद होणार आहेत.
8/10
मुंबईकरांच्या व्यस्त जीवनशैलीत पण गरजेच्या वेळी दिलेली 86 वर्षांची अविरत साथ आता सुटली आहे.
9/10
अनेक चित्रपटांपासून ते इतिहासातही या डबल डेकर बसची छबी उमटली आहे. 86 वर्षांपासून ही बस मुंबईच्या रस्त्यांवरुन धावत होती.
10/10
यावर्षी फेब्रुवारीतच बेस्टच्या ताफ्यात इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस आल्या. त्यामुळे मुंबई दर्शन आता एसीच्या गारव्यासोबत सुखद होईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Published at : 16 Sep 2023 09:02 AM (IST)