Ganeshostav 2023 : खडूंपासून साकारली बाप्पाची मूर्ती, शिक्षणाची जनजागृती करण्याचा भाईंदरमधील मंडळाचा प्रयत्न
यंदा गणपतीच्या देखाव्यातून शिक्षणाची जनजागृती करण्याचा प्रयत्न या मंडळाकडून करण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतर या देखाव्यामध्ये गणपतीच्या मागे मराठी मुळाक्षरे देखील लावण्यात आली आहेत.
मागील 29 वर्षांपासून या मंडळाकडून गणपती देखाव्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा संदेश दिला जातो.
श्री समर्थ मित्र मंडळातर्फे हा सुत्य उपक्रम राबला जातो.
खडूपासून तयार करण्यात आलेली ही मूर्ती साकार करण्यसाठी 18 दिवसांचा कालावधी लागला.
तसेच ही मूर्ती घडवण्यासाठी 180 खडूंच्या बॉक्सचा वापर करण्यात आला आहे.
मूर्तिकार मळेकर यांनी ही मूर्ती घडवली आहे.
यामाध्यमातून एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न मंडळाकडून करण्यात आला आहे.
गणपती देखाव्यातून शिक्षणाची जनजागृती करण्यासाठी भाईंदरच्या एका मंडळाने चक्क खड़डू पासून बाप्पाची मुर्ती तयार केली आहे.
तर खडूंपासून तयार करण्यात आलेली ही बाप्पाची मूर्ती भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होत आहे.