Ganesh Utsav : नेत्यांच्या घरी गणरायाचं उत्साहात आगमन; पाहा पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांच्या घरचा बाप्पा
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बाप्पाची पूजा करतानाचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहपरिवार गणपती बाप्पाचं स्वागत केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.
प्लास्टिकमुळं होणार प्रदूषण थांबवण्यासाठी आपण निश्चय करुयात आणि सिंगल यूज प्लास्टिकचा दैनंदिन वापर बंद करुयात, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
आरोग्य, शिक्षण, पर्यावरण अशा विविध विषयांवर गणेश मंडळांनी जनजागृती करावी, असं आवाहन देखील एकनाथ शिंदे यांनी केलं.
मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या घरी बाप्पाचे स्वागत करण्यात आलं
माजी सहकार मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर येथील निवासस्थानी देखील मोठ्या भक्तीमय वातावरणात गणरायाचं स्वागत करण्यात आलं
काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आमदार भाई जगताप यांच्या घरी बाप्पाचे आगमन झालं
माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांंनी बाप्पाचं दर्शन घेतलं
माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं.
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांच्या घरी गणरायाचं आगमन झालं.
भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या घरी गणरायाचं उत्साहात आगमन झालं.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घरी गणरायाचं भक्तिभावानं स्वागत करण्यात आलं
मनसे नेते राज ठाकरे यांच्या घरी गणपती बाप्पाचं स्वागत कऱण्यात आलं.