'ही शान कुणाची... लालबागच्या राजाची...' यंदा राजा राममंदिरात विराजमान, भक्तांची अलोट गर्दी
वेदांत नेब
Updated at:
31 Aug 2022 09:08 AM (IST)
1
गणपती बाप्पा मोरया... पुढे दहा दिवस महाराष्ट्रभर हाच जयघोष ऐकायला मिळणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कोरोनाचं संकट सरल्यानंतर यंदा मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जात आहे.
3
चांद्यापासून बांद्यापर्यंत गणरायाच्या आगमनाची लगबग सुरु आहे.
4
गणेशोत्सवात अवघ्या देशाच्या नजरा जिथं असतात त्या लालबागमध्ये यावर्षी गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
5
देशभरात प्रसिद्ध असलेला लालबागचा राजा, गणेशगल्लीतला मुंबईचा राजा आणि अन्य मंडळांनी दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचं नियोजन केलं आहे.
6
लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळानं राममंदिराचा देखावा उभारला आहे.
7
वाजत गाजत आणि गुलालाची उधळण करत बाप्पांचं आगमन घरोघरी सुरु झालं आहे.
8
सार्वजनिक गणेश मंडळांमध्येही यावर्षी वेगळा उत्साह आहे.