Jalgoan Railway Accident : जीव वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता उड्या, 11 जणांना रेल्वेने चिरडलं!
Jalgoan Railway Accident : जळगावहून मुंबईकडे येत असलेल्या पुष्पक एक्सप्रेममध्ये आग लागल्याची अफवा पसरली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यानंतर रेल्वेतील अनेक प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून उड्या मारल्या.
मात्र, दुर्दैवाने विरुद्ध बाजूने येत असलेल्या बंगळुरु एक्सप्रेसने या प्रवाशांना चिरडलंय.
आत्तापर्यंत या घटनेत 11 जणांना मृत्यू झालाय. तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. शिवाय मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. जखमींना पाचोऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जळगाव पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, लखनौहुन मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेस बाबत ही दुर्घटना घडली आहे. आग लागल्यामुळे काही लोकांनी गाडीतून उड्या टाकल्या. त्यातील काही प्रवासी उडी मारून कर्नाटक एक्स्प्रेस समोर आले आणि त्यांचा मृत्यू झाला आहे.
त्यात 11 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, 4 गंभीर जखमी देखील आहेत, ते खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, 7 जण किरकोळ जखमी झाले आहेत. गैरसमजातून दुर्घटना घडली,केंद्राने मदत करावी अशी विनंती आता वाहतूक पूर्वपदावर आली आहे, मृतदेह पुढे पाठवण्यात आले आहेत. मी जिल्हाधिकाऱ्यांना बोललो आहे, मदतकार्य वेगाने सुरू आहे. काही रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ संध्याकाळी झालेल्या दुर्घटनेची माहिती आताच मी प्रशासनाकडून घेतली आहे. आग लागल्याची अफवा पसरल्याने पुष्पक एक्सप्रेस मधून काही प्रवाशांनी शेजारच्या रुळावर उड्या मारल्यामुळे सदर दुर्घटना घडली आहे अशी प्राथमिक माहिती मिळते.
रेल्वेचे अधिकारी आणि त्यांची बचाव पथके देखील घटनास्थळी पोहचत आहेत. नक्की किती प्रवासी जखमी आहेत आणि मरण पावले आहेत याविषयी अद्याप आकडेवारी हाती आलेली नाही. मात्र तातडीने बचाव पथकांनी जखमींना रुग्णालयात हलवावे आणि योग्य ते उपचार करावेत अशा सूचना संबंधित प्रशासनाला दिल्या आहेत.
रोहित पवार म्हणाले, पाचोरा (जि. जळगाव) इथं झालेल्या रेल्वे दुर्घटनेत काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जखमी प्रवाशी लवकर बरे व्हावेत, ही प्रार्थना! मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत!
रोहिणी खडसे म्हणाल्या, काळीज पिळवटून टाकणारी अत्यंत दुर्दैवी घटना आहे. जळगाव जिल्ह्यातील परधाडे (पाचोरा) रेल्वे स्थानकावर पुष्पक एक्सप्रेस मध्ये आग लागल्याच्या अफवेने रेल्वेमधून प्रवाशांनी उड्या मारल्याने दुसऱ्या रुळावरील बंगरुळ एक्सप्रेस ला प्रवाशांना धडक बसल्याने अनेक प्रवासी यात मृत्युमुखी पडले आहे. काही ज़ख़मी झाले आहेत त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरु करण्यात आले आहे. अपघातामध्ये मृत्युमुखी पड़लेल्याना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या परिवराला हे दुःख सहन करण्याची ईश्वर शक्ति देवो.