Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नेरळ-माथेरान मार्गावर भव्य निसर्गराजा गणपती साकारणारे 'पायलट' खडे काका काळाच्या पडद्याआड
नेरळ माथेरान रेल्वेमार्गावर सर्वांचे लक्ष वेधून घेणारा एक अवाढव्य गणपती आपल्याला दिसतो तो म्हणजे कड्यावरचा गणपती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआधी हा गणपती तिथे नव्हता, तर माथेरानची मिनी ट्रेन चालवणाऱ्या मध्य रेल्वेच्या राजाराम खडे या लोको पायलटने तो स्वतः घडवला.
दुर्दैवाने आज ते आपल्यात नाहीत. बुधवारी सकाळी त्यांचे निधन झाले.
त्यांना मागील एक वर्षापासून पाठीच्या दुखण्याचा आजार होता. राजाराम खडे हे नेरळ माथेरान नेरळ अशी मिनी ट्रेन चालवायचे.
हे काम करत असतानाच पॅनोरमा पॉईंट जवळ एका खडकात त्यांना गणपती साकारला जाऊ शकतो असे वाटले.
त्यानंतर तब्बल 14 वर्षे त्यांनी कोणत्याही अत्याधुनिक साधनांची मदत न घेता, आपल्या एका कर्मचाऱ्याच्या मदतीने हा गणपती साकारला.
त्याला खडे काकांनी निसर्ग राजा असे नाव दिले.
हा गणपती तब्बल 52 फूट उंच असून, माथेरानच्या निसर्गाच्या कुशीत उभा आहे.
आज हाच गणपती साकारणारे राजाराम खडे मात्र आपल्यात नाहीत. त्यामुळे संपूर्ण नेरळ आणि माथेरानवासीयांवर शोककळा पसरली आहे.