यंदा पॉलिटिकल कंदिलांचा झगमगाट! राज्यातील राजकीय उलाथापालथीत दिवाळीतही पक्षांचा प्रचार
काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. अशातच घराघरांत दिवाळीनिमित्त तयारी सुरू झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिवाळीची साफसफाई, खमंग फराळ आणि दिवाळीनिमित्त आरास यांसारख्या गोष्टींसाठी लगबग सुरू आहे.
दिवाळी आणि निवडणुका असे दोन्ही उत्सव तोंडावर येत आहेत. उत्सव हे प्रचाराचं चांगलं माध्यम असतं.
दिवाळीचं प्रमुख आकर्षण असतं आकाश कंदील. दिवाळीत कंदील लोकांना आकर्षित करत असतो. आपल्या दारी लावलेला आकाश कंदील सर्वांपेक्षा वेगळा आणि आकर्षक असावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते.
अनेकजण घरीच आकाश कंदील बनवतात, तर काहीजण अख्खं मार्केट पालथं घालतात आणि आकर्षक, वेगळा आकाश कंदील शोधून काढतात.
यंदाच्या वर्षी पॉलिटिकल पार्ट्यांच्या कंदीलाकडे सर्व इच्छुक उमेदवारांचा भर आहे. मुंबईतील मोठाल्या चौकांत लावण्यासाठी भले मोठे पॉलिटिकल प्रचाराच्या कंदीलांना मागणी वाढली आहे.
घाटकोपरच्या असल्फा विभागात नितीन खोपकर हे गेले वीस वर्ष आकाश कंदील बनविण्याचा व्यवसाय करतात. दोन वर्षात अशा राजकीय प्रचारांचे कंदीलला मागणी प्रचंड वाढली आहे.
राजकीय पक्षांचा प्रचार दिवाळीत विविध पद्धतींनी सुरू असतोच, त्यातील एक उदाहरण म्हणजे, चौकाचौकात लावले जाणारे मोठाले आकाश कंदील.
आकाश कंदील लोक जाता येता पाहतात आणि अगदी सहज पक्षाचा प्रचार होतो. त्यामुळेच असे आकाश कंदील खरेदी करीत असल्याचं राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
या पॉलिटिकल कंदिलाच्या झगमगाटात दिवाळी तर उजळून निघेलच, पण राजकीय पक्षांचा, उमेदवारांचा प्रचारही जोरदार होत आहे.