PHOTO : वरळी मतदारसंघात अजित पवार, आदित्य ठाकरे साथ-साथ!
राज्यातील दोन प्रमुख नेते आज सकाळीच एकत्र पाहायला मिळालं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघाचा दौरा केला.
वरळीत आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्याकडून विकासकामांची एकत्र पाहणी करण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवारांना घेऊन स्वतः आदित्य ठाकरे यांनी गाडीचं सारथ्य केलं.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरे यांनी मुंबईत वेगवेगळ्या प्रकल्पांच्या उद्घाटनाचा धडाका लावला आहे.
'पुढे चला मुंबई' अशी घोषणाही त्यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर पवार-ठाकरेंच्या या दौऱ्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या वरळी मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह पाहणी केल्यानंतर दोघेही नेते दादर येथे चैत्यभूमीजवळ आले, त्यानंतर दोन्ही नेत्यांनी माहिम येथील रेती बंदर येथेही पाहणी दौरा केला.
अजित पवारांनी दादरमधील व्युइंग डेकची पाहणी केली. तसेच वरळी सीफेसचीही पाहणी केली.
अजित पवारांकडून वरळी मतदारसंघातील विकासकामांचं आणि सौंदर्यिकरणाचं कौतुक करण्यात आलं.
मतदारसंघातील दुरुस्तीच्या कामांचीही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माहिती घेतली.
मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवार-ठाकरेंच्या दौऱ्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.