PAN Card : काय म्हणता तुमच्याकडे पॅन कार्ड नाही? जाणून घ्या पॅन कार्डचे फायदे

PAN Card:देशातील नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी सरकारकडून अशी अनेक कागदपत्रे जारी केली जातात. या कागदपत्रांच्या मदतीने आपण अनेक प्रकारच्या सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतो. या कागदपत्रांशिवाय आपले महत्त्वाचे काम रखडते. असंच एक महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे पॅन कार्ड. पॅनकार्डशिवाय अनेक महत्त्वाची कामे रखडतात. पॅन कार्ड मुख्यतः कोणत्याही कामांसाठी उपयोगी पडते. कसे ते जाणून घ्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्डचा वापर केला जातो. बँकिंग व्यवहारांशी संबंधित कामासाठी लोक त्याचा वापर करतात. आयकर व्यवहारातही पॅन कार्ड खूप उपयुक्त आहे. आर्थिक व्यवहारांसाठी पॅनकार्ड आवश्यक असल्याने कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला ते आवश्यक आहे.

आयकर विभागाने आयकर रिटर्न भरण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य केलं आहे. पॅनकार्डशिवाय तुम्ही आयकर रिटर्न भरू शकत नाही. याबरोबरच इतर कामांमध्ये पॅनकार्डचा वापर केला जातो. जर तुम्ही घर, दुकान इत्यादी मालमत्ता 5 लाखांपेक्षा जास्त खरेदी केली असेल तर त्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. हा नियम आयकर विभागाने विहित केलेला आहे.
याबरोबरच income tax रिटर्न भरताना पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही ITR ची प्रक्रिया पूर्ण करू शकत नाही. याबरोबरच बँक व्यवहारांवर किंवा एका दिवसात 50,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या चेकवर पॅन कार्ड वापरणे आवश्यक आहे.
तुम्हाला ५०,००० रुपयांपेक्षा जास्त एलआयसी प्रीमियम पेमेंट करायचे असेल तर त्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. यासोबतच तुम्हाला कंपनीचे शेअर्स (50,000 रुपयांपेक्षा जास्त) खरेदी केल्यावर पॅन कार्ड द्यावे लागेल. 1 लाखापेक्षा जास्त मूल्य असलेल्या सिक्युरिटी आणि म्युच्युअल फंड युनिट्सच्या खरेदीवरही तुम्हाला पॅन कार्ड द्यावे लागते.
तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास, तुम्हाला पॅन कार्ड देणे आवश्यक आहे. क्रेडिट कार्ड डेबिट कार्डवरही पॅन कार्ड आवश्यक आहे. तसेच, हॉटेलच्या 25,000 च्या बिलावर देखील पॅन कार्ड देणे आवश्यक आहे. 5 लाखांवरील दागिने आणि 5 लाखांवरील कार खरेदी करण्यासाठी देखील पॅन कार्ड अत्यावश्यक आहे.
पॅन कार्ड बनवण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रक्रिया वापरता येतात. ऑनलाईन प्रक्रियेसाठी, तुम्ही आयकर विभागाच्या वेबसाईट www.incometaxindia.gov.in वरून फॉर्म डाऊनलोड करू शकता. तो भरून आणि ऑनलाईन सबमिट करू शकता.