World Nurses Day : जागतिक परिचारिका दिनाच्या निमित्तानं 32 हजार पुश पिनने साकारलं पोट्रेट
आज 12 मे, जागतिक परिचारिका दिन. वैद्यकीय क्षेत्रातील रुग्णसेवेत प्रमुख भूमिका बजावणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. तसेच महाराष्ट्र दिना पासून म्हणजे 1 मे पासून 15 मे पर्यंतचा हा पंधरवडा म्हणजे 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' म्हणून ओळखला जातो. या दोन्ही दिवसांचं औचित्य साधत मुंबईतील एका कलाकारानं एक पोट्रेट तयार केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App6 रंगछटा असलेल्या 62 हजार पुश पिनचा वापर करत 4 बाय 6 फूट लांबीचं हे पोट्रेट साकारण्यात आलं आहे.
महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु आहे. परंतु या संकटात देखील अत्यावश्यक सेवेतील सर्वच कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र आरलं कर्तव्य बजावत आहेत. याच कोरोना योद्ध्यांच्या कामाची दखल घेत चेतन राऊत यांनी पुश पिनच्या सहाय्यानं पोट्रेट तयार केलं आहे.
यापूर्वीही चेतन राऊत यांनी विविध पोर्ट्रेट साकारून तब्बल 14 विश्वविक्रम आपल्या नावे केले आहेत.
अवघ्या 48 तासांत 4 बाय 6 फूट लांबीचं हे पोट्रेट चेतन राऊत यांनी पूर्ण केलं आहे.
चेतन राऊत यांना हे पोट्रेट साकारण्यासाठी सिद्धेश रबसे, मयूर अंधेर आणि 4 वर्षांचा बाल कलाकार आयुष कांबळे यानेही साथ दिली आहे.