Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coastal Road Mumbai: मुख्यमंत्री पुढच्या सीटवर, दोन उपमुख्यमंत्री मागे; व्हिंटेज कारमधून कोस्टल रोडची पाहणी!
मुंबई महापालिकेच्या कोस्टल रोड (Coastal Road) प्रकल्पातील दक्षिण मुंबईला (South Mumbai) उत्तर मुंबईशी (North Mumbai) जोडणारा मरीन ड्राइव्ह (Marine Drive) ते वरळी (Worli) दरम्यानचा दुसरा बोगदा आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कोस्टल रोडची पाहणी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिंटेज कारद्वारे कोस्टल रोडची पाहणी केली. यावेळी एकनाथ शिंदे पुढच्या सीटवर, तर देवेंद्र फडणवीस, अजित पवार मागच्या सीटवर बसलेले होते.
कोस्टल रोडमुळे मरीन ड्राइव्ह ते वरळी असा प्रवास केवळ 9 मिनिटांत करता येणार आहे.
दरम्यान, ही मार्गिका सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत अशी 16 तास खुली ठेवली जाणार आहे.
कोस्टल रोड प्रकल्पाचे आतापर्यंत 90 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामं पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवारी ही मार्गिका बंद ठेवली जाणार आहे.
कोस्टल रोडमुळे मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प हा दोन भागांत विभागला गेला आहे. दक्षिण भाग आणि उत्तर भाग असे हे दोन भाग आहेत. यामध्ये दक्षिण भागाचं काम आधी हाती घेण्यात आलं आहे.
मुंबई ते कांदिवली दरम्यान जवळपास 29 किलोमीटरचा हा कोस्टल रोड प्रकल्प आहे. दक्षिण कोस्टल प्रकल्प हा साडेदहा किलोमीटरचा आहे जो मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाओवर पासून सुरू होतो ते वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंत आहे.