Devendra Fadnavis : मला सरकारमधून मोकळं करा; देवेंद्र फडणवीसांच्या स्फोटक पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे
लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) महाराष्ट्रामध्ये भाजपला जोरदार फटका बसला. महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत यश मिळवलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2019 च्या निवडणुकीत 22 जागांवर यश मिळवणाऱ्या भाजपला यावेळी फक्त 9 जागांवरच विजय मिळवता आला.
लोकसभा निवडणुकीत राज्यात अपेक्षित यश मिळालं नाही, अशी कबुली देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.
राज्यात अपेक्षापेक्षा खूप कमी जागा मिळाल्याचं फडणवीस म्हणाले. मला सरकारमधून मोकळं करा आणि विधानसभेसाठी तयारी करण्यासाठी वेळ द्या, अशी विनंती पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचं फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रात आमची लढाई महाविकास आघाडीसोबत होतीच, त्यासोबतच नरेटिव्हसोबत करावी लागली, असं फडणवीस म्हणाले.
विरोधकांकडून संविधान बदलणार असल्याचा प्रचार जोरात केला गेला, त्याचा आम्हाला फटका बसल्याचं फडणवीस म्हणाले.
शेतकऱ्यांचा कांद्याचा मुद्दा महत्वाचा राहिला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन- कापूस याचे दर कमी झाल्याचं फडणवीसांनी म्हटलं.
भाजपला राज्यात लोकांनी नाकारलं अशी परिस्थिती नाही, तर सम-समान मतं मिळाली आहेत, असं फडणवीस पुढे म्हणाले.
राज्यातील भाजपच्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो आणि ज्यांना जास्त जागा मिळाल्या, त्यांचं अभिनंदन करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
इंडिया आघाडी तयार झाली होती, त्या संपूर्ण इंडिया आघाडीला जितक्या जागा मिळाल्या. त्यापेक्षा जास्त जागा भाजपला देशात मिळाल्या आहेत, असंही ते म्हणाले.