G20 beach cleanup in Mumbai: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून जुहू बीचवर स्वच्छता मोहिम
या मोहिमेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग नोंदवला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वांसोबत स्वच्छतेची शपथ घेऊन या अभियानाचे लोकचळवळीत रूपांतर व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्वच्छता मोहिमांसारख्या उपक्रमांची गरज असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
जुहू बीचची नियमितपणे स्वच्छता करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या कामाचे कौतुक देखील मुख्यमंत्र्यांनी केले.
राज्य शासनानेही पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम सुरु केले असून त्यासाठी पाऊले उचलली असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
ग्लोबल वॅार्मिंग आणि वातारणातील बदलामुळे भेडसावणाऱ्या समस्यांपासून दिलासाही मिळेल असे मत देखील यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.