PHOTO : राज ठाकरे यांच्या घरी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट, पाहा फोटो
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या दोघांत सुमारे पाऊन तास चर्चा झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज ठाकरे यांची आज घेतलेली भेट ही केवळ सदिच्छा भेट होती, त्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
राज ठाकरे यांचे ऑपरेशन झालं होतं, त्यावेळीच मी त्यांना भेटणार होतो. पण आता गणेशोत्सवानिमित्ताने त्यांची भेट घेतली असं मुख्यमंत्री म्हणाले.
या दरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, तसेच आगामी निवडणुकीच्या संदर्भात कोणत्याही समीकरणाची जुळवाजुळव करण्यात आली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आजच्या भेटीदरम्यान जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आनंद दिघे साहेबांच्या आठवणी या वेळी चर्चेमध्ये निघाल्या असं मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले, राज ठाकरे यांचेही आनंद दिघे यांच्यासोबत चांगले संबंध होते. शेवटी आम्ही सगळेजण बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं.
दसरा मेळावा कोण घेणार यावर कोणताही निर्णय नाही, ते नंतर पाहू असं मुख्यमंत्री म्हणाले.
शिवाजी पार्कवर यंदाचा दसरा मेळावा कोण घेणार यावरुन वाद सुरू असून त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, अजून गणपती सुरू आहे, त्यानंतर दसरा येईल. त्यावेळी आपण पाहू.
राज्य सरकारच्या पाठीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री आहेत असं ते म्हणाले.
हे सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे, अतिशय कमी वेळात आम्ही चांगलं काम केलं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.