नवी मुंबईत प्रसिद्ध आहे मिर्ची गल्लीचा राजा
Ganeshotsav 2022 : शिस्तबद्ध मिरवणूक, सामाजिक देखावा यामध्ये दरवर्षी पुरस्कार मिळतो. लालबागच्या राजाचे आकर्षण असल्याने मिर्ची गल्लीतील राजा स्थापन झाला होता. येथे दररोज पारंपरिक भजन, कीर्तन कार्यक्रम ठेवण्यात येते. यंदा 'बेस्ट ऑफ वेस्ट' या तत्वावर वारीचा देखावा तयार करण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील लालबागचा राजा हा राज्यभरातील गणेशभक्तांचा आकर्षण असून याच आकर्षणातून स्फूर्ती घेऊन पनवेलच्या राजाची स्थापना करण्यात आली.
यामुळे, पनवेल येथील 'राजा' म्हणून प्रसिद्ध असलेला स्वराज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मिर्ची गल्लीतील राजा हा पनवेल तालुक्यातील आकर्षण ठरत आहे.
पनवेल शहरातील मिर्ची गल्लीतील काही तरुण मित्र हे दरवर्षी मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनाला नित्यनियमाने जात होते.
गेल्या २० वर्षांपूर्वी या मित्रांनी पनवेलमध्ये देखील अशा राजाची स्थापना करण्याचा निश्चय केला आणि स्वराज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली.
यावेळी, मुंबईतील प्रसिद्ध मूर्तिकार विजय खातू यांच्याकडून सुमारे ११ फूट उंचीची गणेशाची मूर्तीची तयार करून पनवेलच्या मिर्ची गल्लीत पनवेलमधील पहिल्या उंच गणेशाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आणि त्याच नाव झालं 'मिर्ची गल्लीचा राजा'.
मिर्ची गल्लीचा राजा हा पनवेल तालुक्यातील गणेशभक्तांचा आकर्षण बनला आहे. यादरम्यान गेल्या २० वर्षात या मंडळाने मुंबईतील नामांकित मूर्तिकार रमेश रावले, राजू शिंदे , राजन धाड, कुणाल पाटील यांच्याकडून देखील सुमारे 10 ते 14 फूट उंच मुर्त्या तयार करून आणण्यात आल्या आहेत.
पनवेलमधील या मंडळाने दरवर्षी पारंपरिक पद्धतीने भजन- कीर्तनाचे आयोजन करण्यात येते. तर, गणेशोत्सवासाठी तयार करण्यात येणार देखावा हा देखील इकोफ्रेंडली पद्धतीने तयार करण्यात येत असून यंदा 'वारी'चा देखावा तयार करण्यात आला आहे.
image 9
दरम्यान, यंदा या मंडळाने विठ्ठल रूपातील सुमारे ११ फूट उंचीची मूर्ती स्थापन केली आहे.
मुंबईतील परळ येथील मूर्तिकार कुणाल डिंगणकर यांनी ही मूर्ती तयार केली असून पिवळा पितांबर नेसला असनावर विराजमान असलेला विठुरायाची सुरेख मूर्ती गणेशभक्तांना आकर्षित करीत आहे.
या मंडळामार्फत सामाजिक बांधीलकी देखील राखण्यात येत असून कोल्हापूर, महाड येथील पूरग्रस्तांना देखील माणुसकीचा हात देण्यात आला आहे. तसेच, गेल्या 20 वर्षांपासून मिर्ची गल्लीतील राजाचे हे मंडळ कोणताही गुलाल न वापरता पुष्पवृष्टी करीत शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढून नवीमुंबई पोलीस आयुक्तालयाचे पुरस्कार प्राप्त करून आपला वेगळा असा ठसा उमटवला आहे.