CM Eknath Shinde Safai : स्वत: रस्ते धुतले, नाल्यांचीही पाहणी; मुख्यमंत्री एकनाश शिंदे धारावीत
या स्वच्छता मोहिमेला आज रविवारी, सकाळी 7 वाजता शीव (Sion) येथून सुरुवात झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबृहन्मुंबई महानगरपालिकेचे लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय (Sion Hospital) येथील प्रवेशद्वार क्रमांक 7 जवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातून स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन आणि पुष्पांजली अर्पण केली
यानंतर स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली.
कामगारांसोबत मुख्यमंत्र्यांनी स्वत: पाणी मारुन रस्ते स्वच्छ केले.
मुख्यमंत्र्यांनी सायन रूग्णालयात फिरून वैद्यकीय सेवेच्या सज्जतेची पाहाणी केली.
यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री दिपक केसरकर उपस्थित होते
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धारावीतून स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता कामगारांसोबत मिळून स्वत: पाईपनं रस्ता सफाई केली.
सायन धारावी झाल्यावर साहेब दादरच्या चैत्यभूमीला जाऊन केलेल्या तयारीची पाहणी करतील. त्यानंतर मलबार हील आणि गिरगाव चौपाटीची पाहणी करतील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांसह नालेसफाईची पाहाणी केली.
मुख्यमंत्र्यांनी कामगारांना स्वच्छता मोहिमेबद्दल मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या कामाचं कौतुक केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धारावीत रोड शो केला.
स्वच्छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) प्रत्येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात व्यापक स्तरावर संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग) मोहीम राबवण्यात येत आहे.
या मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला.