Chhath Puja 2022 : छठ पूजेसाठी मुंबईच्या जुहू चौपाटीवर तुफान गर्दी!
मुंबईत छठ पर्व उत्साहात साजरा केला जात आहे. 30 ऑक्टोबर रोजी भाविकांनी बुडत्या सूर्याला अर्घ्य देऊन छठी देवीची पूजा-अर्चा केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई यंदा 81 ठिकाणी मोठ्या प्रमाणात छठ पर्वाचं आयोजन करण्यात आलं आहे. परंतु सर्वाधिक गर्दी ही जुहू चौपाटीवर झाली आहे.
प्रशासाने जुहू बीचर छठ पूजेसाठी खास तयारी केली आहे. आज सकाळ (31 ऑक्टोबर) हायटाईड असल्याने समुद्रकिनारी लाईफगार्ड तैनात केले आहेत.
सोमवारी म्हणजेच आज उपवास करणाऱ्या महिलांनी उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन सूर्य देवाची प्रार्थ करुन पाण्यात डुबकी मारली.
यंदा छठ पूजा 30 ऑक्टोबर 2022 रोजी साजरी करण्यात आली.
छठ पूजाचा उत्सव हा सूर्व देवाला समर्पित असून जो मुख्यत्वे चार दिवसांचा असतो.
यंदा छठ पूजेचा प्रारंभ शुक्रवारी (28 ऑक्टोबर) झाला आणि समारोप आज (31 ऑक्टोबर) होणार आहे.
वेद पुराणातील माहितीनुसार छठ देवी, सूर्यदेवाची बहीण आहे. छठ पूजेच्या वेळी या दोघांची पूजा करुन त्यांना प्रसन्न केलं जातं.
छठ पूजेचं व्रत अतिशय कठीण असतं. हे व्रत करणारे 36 तासांचा निर्जळी उपास करतात. छठ पूजा विशेषत: बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, नेपाळ या ठिकाणी केली जाते.