In Pics : मुंबईकर गृहिताची कमाल, वयाच्या 8 व्या वर्षी कमाल, माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प यशस्वीरित्या केला सर
जगातील सर्वात उंच, कठीणात कठीण ट्रेक म्हटलं की माउंट एव्हरेस्ट.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंतचा हा ट्रेक मुंबई्च्या गृहिता विचारे हिने नुकताच पार केला.
अवघ्या 8 वर्षीय गृहिताने 28 ऑक्टोबर 2022 रोजी यशस्वीरीत्या हा ट्रेक पूर्ण केला आहे.
तब्बल 13 दिवसांचा हा ट्रेक, जो काठमांडूपासून (समुद्र सपाटीपासून 1400 मीटर उंच) रामेछाप विमानतळापर्यंत 4 तासांचा आहे.
गृहिताने ही कमाल करत अशी कामगिरी करणारी ती सर्वात छोटी मुंबईची मुलगी बनली आहे.
सरळ चढ असलेली शिखरं सर करणे, उणे अंश तापमानाशी झुंझ (minus degree), थंडगार वारा, गोठलेले पाणी, ऑक्सिजनची घसरत जाणारी पातळी अशा आव्हानांचा गृहिताने सामना यावेळी केला.
काहीही झालं तरी ते उंच टोक गाठायचं म्हणजे गाठायचच अशी जिद्द उराशी बाळगून गृहिताने तिच्या वडिलांसह ही कमाल केली.
यावेळी गृहिता आणि तिच्या वडिलांनी कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवरायांच्या आशिर्वादाने आम्ही हे सहज शक्य केलं, अशी प्रतिक्रिया दिली.
गृहिता भविष्यात आणखी कमाल कामगिरी नक्कीच करेल अशी आशा आहे.
गृहिता या यशस्वी कामगिरीनंतर लवकरच मुंबईकडे परतणार आहे.