PHOTO : पालघरमध्ये वारली चित्रकलेतून कोरोना आणि लसीकरणाबाबत जनजागृती
कोरोना संसर्ग तसंच लसीकरण याबाबत आदिवासी समाजात भीती आणि गैरसमज आहेत. हे दूर करण्यासाठी पालघरमधील वारली चित्रकारांनी चित्रकलेतून आदिवासी बांधवांना लक्षणे दिसल्यास चाचणी करण्याचे तसेच लसीकरण करण्याचा संदेश दिला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअकरावीत शिकणारी तन्वी वरठा आणि सुचिता कामडी या दोन विद्यार्थीनींनी आदिवासी बोलीभाषेचा वापर करुन केलेल्या वारली पेंटिंगचा आदिवासी समाजामध्ये कोरोनाविषयी जनजागृती होण्यास मदत होत आहे.
पालघर जिल्ह्यात डहाणू, तलासरी, पालघर, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा हा भाग आदिवासीबहुल असून आदिवासी समाजात कोरोना आजाराविषयी भीती आणि गैरसमज आहेत.
ताप, खोकला, सर्दीसारखी लक्षणे असताना अंगावर आजार काढण्याचे तसंच गावठी औषधोपचार करण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार होताना दिसत आहे.
त्याचबरोबर कोरोना अजारासाठी प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी आदिवासी समाजात भीतीचे वातावरण असून गैरसमज पसरवले जात आहेत. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.
परिणामी तन्वी अणि सुचिता यांनी बोलीभाषेचा वापर केला आणि कोरोना लक्षणांची माहिती देऊन औषधोपचार तपासणी करण्यासाठी आदिवासी समाजाला आवाहन केलं आहे.