In Pics : अक्षय्य तृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपती आणि सिद्धीविनायक मंदिरात आंबा महोत्सव
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुण्यातील सर्वाचेच लाडके दैवत असलेल्या दगडुशेठ गणपतीला आणि मुंबईतील श्री सिद्धीविनायक गणपतीला हापूस आंब्याची आरास करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे अक्षय्य तृतीयेनिमित्त गणपती मंदिरात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी दगडूशेठ गणपतीला 1,111हापूस आंब्याची आरास करण्यात आली.
दरवर्षी ही आरास मोठ्या प्रमाणात केली जाते. पण, यंदा कोरोनाचे सावट पाहता साध्या पध्दतीने यावर्षी अक्षयतृतीया मंदिरात साजरी केली जात आहे.
दुसऱ्या दिवशी हा आंब्याचा प्रसाद ससुन रुग्णालयात रुग्णांना दिला जातो. दरम्यान, कोरोनाचे सावट पाहता मंदिरात भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आली असुन बाहेरूनच भाविकांना बाप्पाचे दर्शन घ्यावे लागत आहे.
मुंबईतील सिद्धीविनायक गणपती मंदिरातही आंब्याची आकर्षक सजावट पाहायला मिळाली.
यावेळी गणरायाची आरास अनेकांचं लक्ष वेधून गेली.