Aashadh Deep Amavasya 2023 : आषाढ दीप अमावस्या निमित्त शेकडो विद्यार्थ्यांनी केलं दिव्यांचं पूजन...
घाटकोपर च्या शिवाजी शिक्षण संस्थेत आज आषाढ अमावस्ये निमित्त दीपपूजा कार्यक्रमाचे आयोजन केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया कार्यक्रमात एका टेबलावर विविध आकाराच्या विविध धातूच्या दीवे पेटविण्यात आले होते.
त्यात मातीचे, चिनी मातीचे, दगडाच्या विविध प्रकाराचे, विविध धातूच्या दिव्याचा त्यात समावेश होता.
विजेवर चालणाने दिव्याचे प्रकारही पूजास्थानी ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी वर्गावर्गाच्या गटाने येऊन दिव्याची पूजा केली.
प्रार्थना म्हणून एकाग्रपणे विविध दिव्याचे निरिक्षण केले. विद्यार्थ्यांना हा सण का साजरा केला जातो त्याची तसेच दिव्याच्या विविध प्रकाराची माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढावी यासाठी त्यांना दिव्याच्या जोतीकडे एकटक बधून एकाग्रता कौशल्य वाढीचे प्रशिक्षण देण्यात आले.
आपले आयुष्य इतरांच्या कल्याणासाठी वेचलेल्या महात्म्याचे स्मरण या दिवशी करावे इत्यादी मार्गदर्शन मुलांना करण्यात आले.
विजेचा वापर जपून करावा. वीज कशी वाचवावी याची माहिती देण्यात आली. दीवा स्वत: जळतो व दूसऱ्यांना प्रकाश देतो.
दीप अमावस्येला दिव्यांचं पूजन करून संध्याकाळी श्लोक म्हटले जातात. तिमिराकडून तेजा कडे नेणारा दिवा हा हिंदू धर्मामध्ये कायमच पूजनीय राहिला आहे.
या दिव्याची पूजा करून अधर्माकडून धर्माकडून, दु:खाकडून सुखाकडे प्रवास व्हावा अशी मनोकामना केली जाते.
आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या ही आषाढ महिन्यातील अखेरीस येणाऱ्या अमावस्येला म्हटलं जातं.
आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या असं मानलं जातं. श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी अमावस्या येते
या अमावास्येला गुरुपुष्यामृत योग देखील आहे. या अमावास्येला दीपपूजनाला अधीक महत्व प्राप्त झाले असून, ते भाग्यकारक मानले गेले आहे.