MNS: 'एक सही संतापाची' या मनसेच्या मानवी साखळी अभियानाची राज ठाकरेंकडून पाहणी, मनसेचं शिवाजी पार्कमध्ये अभियान

MNS Signature Campaign : सध्या राज्याच्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींवरुन नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

MNS Signature Campaign

1/9
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एक सही संतापाची हे अभियान राबविण्यात आलं.
2/9
या बॅनरवर नागरिकांनी सहीच नाही तर विविध संतापलेले मत सुद्धा मांडले आहेत.
3/9
तसंच राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसेच्या पदाधिकारी हे बॅनर घेऊन मुंबईत दाखल झालेत.
4/9
राज्यात सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडींचा विरोधात मनसेने आंदोलन छेडले आहे.
5/9
मनसेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात एक सही संतापाची ही स्वाक्षरी मोहीम घेण्यात येत आहे.
6/9
मुंबईच्या दादर विभागात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली या स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात झाली आहे.
7/9
सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेण्यात येत आहेत.
8/9
एका भल्या मोठ्या फ्लेक्सवर सामान्य नागरिकांच्या स्वाक्षरी घेऊन राज्यातील या राजकारणाचा निषेध व्यक्त केला जात आहे.
9/9
मनसेच्या या आवाहनाला लोकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
Sponsored Links by Taboola