पावसाळ्यातील आरोग्याबाबत तरुणाची अनोख्या पद्धतीने जनजागृती, पाहा फोटो
पावसाळा सुरू आहे,त्यात साथीचे आजार तसेच कीटकजन्य आजार डोके वर काढू लागले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया आजारांवर मुंबईत नियंत्रण आणण्यासाठी तसेच आजार रोखण्यासाठी मुंबईत विविध वस्त्यांमध्ये , शाळांमध्ये फिरून अशोक कुर्मी नामक तरुण जनजागृती करत आहे.
स्वतः किटकांसारखे कपडे घालून काय करू नये काय करावे याविषयी सर्वसामान्य व लहानग्यांना कुर्मी हे जनजागृती करत आहेत.
धारावीत राहणारे अशोक कुर्मी हे फार्मा कंपनीत काम करतात, मात्र सामाजिक कार्याची आवड असल्याने, ते हे काम करत आहेत. दरवर्षी ते आपण समाजाचा काहीतरी देणं लागतो यासाठी सामाजिक उपक्रम राबवतात.
कोरोना काळात अनेक ठिकाणी मुंबईत त्यांनी निजंतुकीकरण करत लोकांना जनजागृती केला होत. तसेच आदिवासी दिन अशा अनेक प्रकारच्या दिनविशेष दिवशी, ते उपक्रम राबवत लोकांपर्यंत अनेक विचार पोहोचवत असतात. त्यामध्ये आता पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून सावधानता बाळगावी याविषयी ते लोकांना जागृत करत आहेत.
यामध्ये अशोक हे स्वतः कीटकासारखे वेशभूषा परिधान करतात आणि मुंबईतील धारावी सायन माटुंगा दादर कुर्ला या भागामध्ये आजारांविषयी आणि खबरदारी विषयी जनजागृती करतात. यामध्ये ते शाळांमध्ये लहान मुलांना चार्ट बोर्ड द्वारे काय करायला हवं, काय करायला नको याविषयी सांगतात. आपल्या नोकरीतील फावल्या वेळात अशोक हे मुंबईत फिरत असे समाज उपयोगी काम करतात.