PHOTO : अंधेरीतील चित्रकूट सेटला भीषण आग, परिसरात धुराचे लोट
मुंबईतील अंधेरी पश्चिम भागातील चित्रकुट मैदानात तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या चित्रपटाच्या सेटवरील सामानाला आग लागली आहे. आगीमुळे संपूर्ण आकाशात धुराचे लोट दिसत आहेत.
Mumbai Level two fire reported in Andheri West area
1/11
मुंबईच्या अंधेरी पश्चिमेत चित्रकूट सेटवर लागली मोठी आग लागली असून अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
2/11
आगीमुळे संपूर्ण आकाशात धुराचे लोट दिसत आहेत. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
3/11
अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
4/11
आग लागल्यामुळे संपूर्ण परिसर धुक्याने व्यापला असून सध्या घटनास्थळी किती लोक अडकले आहेत? किती जणांची सुटका करण्यात आली आहे? ही माहिती समोर आलेली नाही.
5/11
आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
6/11
अंधेरी येथील क्रीडा संकुलाच्या मागे ही आग लागल्याची माहितीही समोर आली आहे.
7/11
धुराचा लोट इतका मोठा आहे की, पोलिसांशिवाय जलविभाग आणि एमएफबीही घटनास्थळी हजर आहेत.
8/11
चित्रकुट मैदानावर रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या आगामी चित्रपट 'लव रंजन'चा सेट उभारण्यात आला होता.
9/11
सेट वर लाईटिंगचे काम सुरू होते त्यावेळी आग लागली आहे.
10/11
पुढील आठवड्यापासून चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात होणार होती. शेजारी राजश्री फिल्मचे दोन सेट होते. त्याला आग लागलेली नाही.
11/11
सेटचे काम सुरू असल्याने अनेक कामगार आगीमध्ये अडकल्याचा अंदाज आहे.
Published at : 29 Jul 2022 05:27 PM (IST)