Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maratha Reservation : उपोषणासंदर्भात जरांगे पाटील आज निर्णय घेणार, सरकारसोबतच्या चर्चेनंतर तोडगा निघणार का?
मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सह्याद्री अतिथीगृहात मध्यरात्रीपर्यंत बैठक पार पडली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया बैठकीमध्ये जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्या मांडल्या आहेत. त्यावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
या बैठकीला विविध जिल्ह्याचे जिल्हाधिकारी देखील ऑनलाईन उपस्थित राहिले होते.
मराठा समाजासाठी केलेल्या उपाययोजनांची तपशीलवार माहिती यावेळी देण्यात आली. पुढील कार्यवाहीसंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा झाली आहे.
तब्बल अडीच तास ही बैठक चालली. या बैठकीमध्ये झालेली सविस्तर चर्चा शिष्टमंडळ जरांगे पाटील यांना कळवेल. त्यानंतर जरांगे पाटील आज यासंदर्भात आपली पुढची भूमिका मांडतील असं यावेळी शिष्टमंडळाच्या आणि सरकारच्या वतीनं सांगण्यात आले
शिष्टमंडळ बैठकीत झालेली सर्व माहिती जरांगे पाटील यांना देईल. त्यानंतर जरांगे पाटील आज 11 वाजता आपला पुढचा निर्णय जाहीर करतील.
जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती या बैठकीत सरकारकडून शिष्टमंडळाला करण्यात आली आहे.
आंदोलनादरम्यान जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते मागे घ्यावे. जालना येथील घटनेमध्ये संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी आदी मागण्या शिष्टमंडळाने सरकारपुढे मांडल्या.
या बैठकीमध्ये जरांगे पाटील शिष्टमंडळाने नुकताच काढलेल्या जीआरमध्ये काही अटी न ठेवता सरसकट सर्वाना प्रमाणपत्र द्यावे ही मागणी करण्यात आली.