Manoj Jarange Patil : धाकटी पंढरी...मनोज जरांगेंच्या नारायण गडावरील दसरा मेळाव्याला तुफान गर्दी
मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा दसरा मेळावा आज (दि.12) नारायण गडावर पार पडणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, मनोज जरांगेंना ऐकण्यासाठी नारायण गडावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
मेळाव्यापूर्वी जरांगेंनी महाराष्ट्रातील जनतेला विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आत्ता जे काही बोलायचं ते तिथून बोलीन. सर्वांनी शांततेत यावं आणि जावं कुणी काही केल्याने आपापली एकजूट कमी होत नाही, असं आवाहन मनोज जरांगेंनी केलं आहे.
राज्यातील जनता साडेबारा पर्यंत गडावर पोहोचेल आणि साडेबारा वाजता मी कार्यक्रम सुरू करेन. जे बोलायचं तिथून बोलेन तिथे किती लोक येतील हे सांगता येणार नाही, मोजणारे मोजतील, असंही जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील आज (दि.12) आगामी विधानसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट करणार आहेत.
राज्यात आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारने मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावे.
अन्यथा विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार पाडणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. आज ते विधानसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट करु शकतात.
दरम्यान, नारायण गडावर येणाऱ्या लोकांसाठी प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. शिवाय, आरोग्याच्या दृष्टीने गडाजवळ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे मनोज जरांगे आज दसरा मेळाव्यात कोणती भूमिका घेणार? याकडे राज्याचे लक्ष आहे.