PHOTO : लातूर शहराला पिवळसर पाण्याचा पुरवठा
लातूर शहरात पिवळसर आणि दुर्घंधीयुक्त पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांतून संपात व्यक्त होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलातूर शहराला मांजरा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. पाईपलाईनद्वारे मांजरा धरणातून पाणी हरगुळ जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत येते. येथे त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया होते.
शुद्धीकरणानंतर संपूर्ण शहराला पाणी पुरवठा केला जातो. मात्र, येथील गेटवॉल आणि त्याच्या पुढील पाईपलाईनच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी अनेक वर्षांपासून कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे नळाद्वारे येणाऱ्या शुद्ध पाण्यात धरणातील पाणी मिसळत आहे.
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सात दिवसांपासून शहरात पिवळे पाणी येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर नागरिकांनी याबाबत तक्रारही केली.
नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने पाण्याची तपासणी करून पाणी पिण्यालायक आहे असा अहवाल दिला. मात्र याबाबत लातूरकरांनी आंदोलनाची भूमिका घेतली. त्यामुळे आज शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.
महानगरपालिका प्रशासनाकडून जलशुद्धीकरण केंद्रावरील गेटवॉल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे आज होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
लातूर शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रावर दोन सेटलिक टँक आहेत. यापैकी एका टँकच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दोन-अडीच वर्षांपासून साफसफाई करण्यात आली नव्हती.