In Pics : झोलाई देवीच्या यात्रेत चैतन्याची लाट!
कोकण पर्यटनाची अनुभूती देणाऱ्या झोलाई-सोमजाई देवीच्या यात्रेची गुरूवार 21 एप्रिल रोजी सांगता झाली
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App.रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आंबवली गावामध्ये सहा दिवसांपासून यात्रेचा रम्य सोहळा सुरू होता.
जत्रोत्सवाच्या निमित्ताने चैतन्य आणि उत्साहाची लाट संपुर्ण आंबवली-वरवली गावात पसरली
यात्रेच्या काळात पहिल्या तीन दिवसांमध्ये 22 फुट लांब लाकडी लाटेच्या खेळाने उपस्थितांची मने जिंकली
लाटेच्या दर्शनाने मुंबई, ठाणे, पुणे, इगतपुरीहून आलेल्या चाकरमान्यांच्याही डोळ्यांची पारणे फिटली आहेत
यात्रेच्या अखेरच्या दोन दिवसांमध्ये गावागावांच्या पालख्यांच्या उपस्थितीने झोलाईदेवी मंदिर उजळून निघाले होते.
मोकळ्या जागेमध्ये लाटेचा खेळ पाहण्यासाठी असंख्य भाविक जमा होत होते.
झोलाई देवीच्या मंदिरासमोरील सारावर (उंच चौथऱ्यावर) चढवण्यात आली.