In Pics : यवतमाळमधील बांबूची प्रयोगशील शेती
बांबू टणक, लवचिक आणि वजनाने हलका असल्याने घराच्या बांधकाम पासून फर्निचर पर्यंत त्याचे बहुउपयोग असल्याने बांबुला कल्पवृक्ष सुध्दा म्हटले जाते. शेतकऱ्यांनी बांबू किमान शेताच्या धुऱ्यावर लावून यातून जमिनीची होणारी धूप कमी करता येते आणि यातून शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न सुद्धा मिळते. यवतमाळ सारख्या जिल्ह्यात याची लागवड वाढावी म्हणून जिल्ह्याच्या पांढरकवडा तालुक्यातील मांगुर्डा येथे श्रुजन या बांबू संशोधन केंद्रात अजय डोळके प्रयत्नरत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखरे तर शेतकऱ्यांनी बांबू लागवडीसाठी करणे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे.पूर्वी जंगलात आढळणारा बांबू आता शेतात रुजला आहे आणि तो भरपूर रुजला तर यातून 3 ते 4 वर्षानंतर शेतकऱ्यांना आर्थिक नफा सुध्दा होवू शकतो बांबूच्या वेगवेगळ्या प्रजाती असून त्यातील काही प्रजाती आहेत ज्या 45 ते 110 वर्षा पर्याय देखील त्यापासून उत्पन्न मिळू शकते.
महाराष्ट्र बांबु डेव्हलपमेंट बोर्डचे मुख्य कार्यालय नागपुरात आहे त्यात अटल बांबू योजना आणि राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत शेतकऱ्यांना बांबूची रोप येथून मिळतात या शिवाय दुसरे महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन सुध्दा बांबू लागवड साठी कार्य करते आणि तिसरे बांबु रिसर्च आणि ट्रेनिंग सेंटर चीचपल्ली चंद्रपूर हे सुद्धा बांबु लागवड दृष्टीने कार्य करीत आहे.
मांगुडा येथे अजय डोळके यांच्या 5 एकर मध्ये 54 प्रकारच्या बांबूचे पीक घेतले असून प्रत्येक जातीचे 50 रोप सुध्दा त्यांनी लागवड केली आहे शिवाय ते बांबू रोप सुध्दा परिसरातील नागरिकांना विक्री करतात त्यातून त्यांना आर्थिक फायदा होतो शेतकऱ्यांनी धुऱ्यावर बांबु लागवड करावी ज्यामुळे शेतकऱ्याला यातून किमान 3 ते 4 वर्षानंतर त्यांना हमखास उत्पन्न मिळेल असं त्यांचे म्हणणे आहे.
मध्य भारतातील वातावरण येथील पर्जन्यमान आणि उष्णता या बाबी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी बांबु ची लागवड करावी असे अजय डोळके सांगतात ज्या बांबूच्या जातीच्या प्रजातीच्या पानाचा आकार (साईज) छोटा ते बांबू लागवड या भागात यशस्वी होते .उष्ण वातावरण हिवाळा आणि जमिनीचा प्रकार नुसार बांबूची लागवड करावी आणि त्याची उपयोगीता ठरवून लागवड करावी असेही त्यांचे म्हणणे आहे.
बांबू पासून इथेनॉल, बायोसीएनजी तयार होतात शिवाय अगरबत्ती च्या काड्याना बांबूच लागतो बांबू पासून घर सुध्दा सजावटीच्या वस्तू सुद्धा बनतात मात्र प्रत्येक वस्तू साठी बांबू च्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत त्यामुळे त्याची उपयोगीता ओळखुन बांबूची लागवड केली जावी असे त्यांचे म्हणणे आहे. बांबू अनेक कामासाठी उपयोगात येतो त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबु लागवड करावी आणि शेतीला जोड म्हणून बांबु लागवड कडे शेतकऱ्यांनी बघावं अस त्यांचे म्हणणे आहे.