In Pics : सिंधुदुर्ग किल्ला! शिवप्रभूंची शिवलंका वादळाच्या तडाख्यात
तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा संपूर्ण कोकण किनारपट्टीला बसला मात्र सर्वाधिक फटका हा सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यालाही तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे.
शिवप्रभूंची शिवलंका नावाजलेल्या मालवणच्या समुद्रातील सिंधुदुर्ग किल्यावर तोक्ते चक्रीवादळामुळे झालेली घरांची, वीज खांबांची झालेली पडझड, मोडून पडलेली झाडे आणि गेले बारा दिवस विजे अभावी जीवन जगणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ले वासीयांपर्यंत आजही सिंधुदुर्गचे प्रशासन बारा दिवस उलटूनही पोहोचलेले नाहीत.
तोक्ते चक्रीवादळात सिंधुदुर्ग किल्यावरील शिवराजेश्वर मंदिराच्या मागील भागावर वडाचे झाड पडून नुकसान झाले आहे.
किल्ल्यातील भवानी आणि महापुरुष मंदिरावरील छप्पर उडून गेले आहे. वीज खांबांची पडझड झाल्याने सिंधुदुर्ग किल्ला अंधारात आहे.
त्यामुळे तोक्ते चक्रीवादळात निसर्गाने झोडपल आणि प्रशासनाने लाथाडलं अशी अवस्था झाल्यामुळे दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न सिंधुदुर्ग किल्लावासीयांना पडला आहे.