PHOTO : उजनी धरणाच्या यशवंत जलाशयातील पाण्याची पातळी उणे साठ्यामध्ये
पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या यशवंत जलाशयातील पाण्याची पातळी 13 मे रोजी उणे (-)( मायनस) साठ्या मध्ये गेली आहे. यापुढे कालवा, बोगदा, अनेक उपसा सिंचन योजना, उद्योगधंदे या सर्वांसाठी मृतसाठ्यातील पाण्याचा वापर होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउजनी धरणाचा मृतसाठा हा 63 टीएमसी आहे. मागीलवर्षी 13 मे रोजी उजनी धरण उणे (मायनस) मध्ये गेले होते. विशेष म्हणजे पाण्याचा मृतसाठा हा उपयुक्त साठ्याच्या जादा असणारे उजनी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे.
जेव्हा उजणीचे पाणी उणेमध्ये जाते तेव्हा सीना, माढा आणि दहिगाव उपसा सिंचन योजना बंद होतात. मात्र पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरुच राहतो.
उजनी धरणात पावसाळ्यात 111 टक्क्यांपर्यंत पाणीसाठा केला जातो. आणि हे पाणी 123 टीएमसी असते. 123 पैकी 60 टिएमसी हा जिवंत पाणी साठा असतो. हे पाणी जलसंपदा पाटबंधारे विभागाच्या आखत्यारित, वापरासाठी नियोजीत केलेले असते. तर मृतसाठा 63 टीएमसी असतो. यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत नियोजन करण्यात येते.
16 ऑक्टोबर 2020 पासून आजपर्यंत जिवंत 60 टीएमसी पाण्याचा वापर झालेला आहे. यामधून नदी, कालवा, बोगदा, मोठ्या उपसा सिंचन योजना, वीज निर्मिती, तीन जिल्ह्यातील एमआयडीसी, साखर कारखाने, सिनार मास उद्योग, सोलापूर शहरासहीत शेकडो गावच्या पाणीपुरवठा योजना आणि हजारो शेतकऱ्यांनी खाजगीरित्या केलेल्या उचल पाणी योजना चालवण्यात आलेल्या आहेत.
आता हा संपूर्ण भार उजनी जलाशयाच्या मृतसाठ्यातील 63 टीएमसी पाण्यामधून होणार आहे.
फोटो : उजनी धरण