सोलापुरातील आयुर्वेदिक महाविद्यालयातील लसीकरण केंद्रात नागरिकांना बसल्या जागेवर मिळतेय लस
सोलापुरातील शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयात महानगरपालिकेतर्फे लसीकरण करण्यात येत आहे. शहरातील सर्वाधिक लसीकरण होण्याऱ्या केंद्रावर लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने उत्तम व्यवस्था करण्यात येत आहे. या केंद्रावर कोणत्याही नागरिकाला रांगेत उभं राहण्याची गरज नाहीये.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रत्येकाला बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. बाहेर गावातून आलेल्या नागरिकांसाठी चहा, नाष्ट्याची व्यवस्था देखील या केंद्रावर करण्यात आली आहे.
विशेष बाब म्हणजे या केंद्रावर प्राप्त लसींपेक्षा अधिक लोकांचे लसीकरण केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतूक केलेल्या केरळ पॅटर्नचा या ठिकाणी अवलंब केला जात असल्याचे दिसत आहे.
5 मे रोजी या लसीकरण केंद्रावर 100 डोसेस प्राप्त झाले होते तर 7 लोकांना अतिरिक्त लसीकरण करत एकूण 107 लोकांना लस देण्यात आले. तर 6 मे रोजी 200 लस मिळाले होते मात्र केंद्राने 229 लोकांचे लसीकरण केले. अशाच पद्धतीने 12 मे रोजी 575 लसी मिळाल्या होत्या मात्र केंद्राने योग्य पद्धतीने लसीकरण केल्याने 600 लाभार्थ्यांना लस देण्यात आले.
प्रत्येक व्यक्तीला 10 मिलीचा डोस दिला जातो. मात्र, लसीच्या कुपीत जवळपास 11 ते 12 मिली डोस असतो. व्यवस्थित डोस भरल्याने एकही थेंब वाया जात नाही. त्यामुळे दररोज प्राप्त होणाऱ्या वायल्स पेक्षा अधिक लोकांचे वॅक्सिनेशन या केंद्रावर केले जात आहे.
तसेच ज्या ज्येष्ठ नागरिकांना, दिव्यांगाना चालण्यास त्रास येतो अशा लोकांना केंद्रात येण्याची सक्ती न करता जाग्यावरच लस उपलब्ध करुन दिली जात आहे. लसीकरण केंद्रावरील या व्यवस्थेमुळे नागरिकांमधून देखील समाधान व्यक्त केले जात आहे.
नागरिकांचा बराच वेळ नोंदणी प्रक्रियेसाठी जातो. त्यामुळे अधिकचे संगणक वापरुन तो वेळ कमी केला आहे. तसेच बाहेरुन येणाऱ्या नागरिकांसाठी चहा पाण्याची व्यवस्था लोकप्रतिनिधी या नात्याने केली आहे. अशी प्रतिक्रिया सोलापूर महानगर पालिकेचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी दिली.