PHOTO : विठ्ठल आवडी प्रेमभाव... अक्षय्य तृतीयेनिमित्त विठुमाऊलीच्या गाभाऱ्याला आमराईचं रुप
आज वैशाख शुद्ध तृतीय अर्थात अक्षय्य तृतीया.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
यंदा अक्षय्य तृतीया कोरोनाच्या सावटात साजरी केली जातेय.
अक्षय्य तृतीयेच्या निमित्तानं विठ्ठल मंदिरात 6501 आंब्यांची आकर्षक आरास करण्यात आली.
पुणे येथील भाविक विनायक काची (बुंदेला ) यांनी आजच्या मुहूर्तावर विठ्ठल मंदिराला सजावट केली.
विठुरायाचा गाभारा आणि मंदिर सजवण्यासाठी 6501 हापूस आंबे आणि इतर फळांचा वापर करण्यात आला.
पुण्यातील किसन सीताराम ब्रदर्स यांनी या फळांच्या मदतीने मंदिरात अतिशय आकर्षक पद्धतीने सजावट केलं आहे.
अक्षय्य तृतीयेच्या निमित्तानं विठ्ठल मंदिराला आमराईचे रूप दिले आहे.
आज अक्षय्य तृतीयेला आंब्याचे महत्व असल्याने विनायक काची काही यांनी हे आंबे अर्पण करून सजावटीची सेवा दिली आहे.
विठ्ठल रुक्मिणी गाभारा, चौखांबी आणि सोळखांबी येथे या शेकडो आंब्याच्या सजावटीमुळे विठ्ठल मंदिर आंब्याच्या गंधानं दरवळून निघाले आहे.