PHOTO : लेकीच्या जन्माचं भव्य स्वागत; हत्तीवरुन जिलेबी वाटली अन् गावजेवण दिलं!
वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा, या हव्यासापोटी गर्भातच कळी खुडण्याचे प्रकार आजूबाजूला घडत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअसं असताना उस्मानाबाद जिल्ह्यातील गुळहळ्ळी येथे मात्र वंशाची पणती असलेल्या स्त्री जन्माचे स्वागत चक्क हत्तीवरून जिलेबी वाटून करण्यात आले.
या कुटुंबात 28 वर्षांनंतर मुलगी जन्माला आल्याने शुक्रवारी गावातून हत्तीवरून मुलीची मिरवणूक काढून जिलेबी वाटप करण्यात आली.
गुळहळ्ळीच्या शिवरुद्र आनंदाप्पा हांजगे यांना कन्यारत्न प्राप्त झाल्यामुळे त्याचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी गावात बँडबाजा, तुतारी व ढोल- ताशांच्या गजरात जिलेबीचे वाटप केले.
हांजगे यांच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे. त्यांनी हत्तीला सजवून कन्येची गावातून मिरवणूक काढली.
गुळहळ्ळी येथील हांजगे परिवारात 7 एप्रिल रोजी कन्यारत्न जन्माला आले.
स्त्री जन्माचा स्वागत सोहळा त्यांनी केला. हाजंगे कुटुंबाला या माध्यमातून सामाजिक संदेश द्यायचा होता.
मुलगी ही दोन घरांमध्ये आनंद निर्माण करते. सर्वच क्षेत्रांत मुलींनी बाजी मारलेली आहे. त्यामुळे भेदभाव न करता जन्माला आलेल्या प्रत्येकाचे स्वागत करावे, यासाठी हा सोहळा साजरा केला.
हा आनंद साजरा करण्यासाठी हांजगे कुटुंबीयाने कोल्हापूरहून हत्ती आणला. त्यासाठी 80 हजार रुपये मोजले. तर हत्ती आणण्यासाठी ट्रक भाडे 15 हजार रुपये झाले. 100 किलो जिलेबी वाटून गावजेवणही दिले.
सकाळी हत्तीवरून जिलेबी वाटप झाल्यानंतर सायंकाळी मुलीचा नामकरण सोहळा करण्यात आला.