Unseasonal Rain : रत्नागिरीत अनेक भागात अवकाळी आणि गारपीट, आंबा उत्पादकांना फटका
एकीकडे राज्यात उन्हाचा चटका वाढत असतानाच दुसरीकडे राज्यातील काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचिपळूण, संगमेश्वर, खेड, दापोली, गुहागरमध्ये जोरदार पाऊस बरसला.
चिपळूण,संगमेश्वर,खेड,दापोली,गुहागर मध्ये जोरदार पाऊस बरसला.
तर संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यातील काही गावांत गारांचा पाऊस पडला.
काही गावातील वीज काही तास बंद झाली आहे.
वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे चिपळूण कराड मार्गावरील पोफळी येथे रस्त्याच्या मधोमध झाड पडल्याने तेथील वाहतूकही ठप्प झाली आहे.
या अवकाळी पावसामुळे आधीच उशीरा हातात आलेल्या आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आंबा बगायतदार चिंतेत पडला आहे.
.घरांवरील कौले,पत्रे उडून तुटले आहेत तर गुरांच्या गोठ्यांचेही नुकसान झाले आहे
.त्याचप्रमाणे हाती आलेल्या आंब्या पिक वाऱ्याने खाली तुटून पडल्याने बगायतदारांचे नुकसान झाले आहे..