भेटी लागी जीवा लागलीसे आस... घटस्थापनेच्या मुहूर्तावर विठुरायाची राऊळी भक्तांसाठी खुली
आज शारदीय नवरात्राला सुरुवात होत असताना गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेली राज्यातील मंदिरे खुली झाली आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appघटस्थापनेच्या या शुभमुहूर्तावर विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
पुण्यातील येथील विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांनी हि फुलांची सेवा दिली असून आजच्या सजावटीसाठी विविध प्रकारच्या जवळपास अडीच टन फुलांचा आणि तुळशीपत्राचा वापर केला आहे.
लक्षावधी तुळशीच्या पानांसह झेंडू , गुलाब, अष्टर , शेवंती , जरबेरा , कागडा , कामिनी , ग्लॅडीओ या फुलांचा देखील वापर करण्यात आला आहे .
विठुरायाच्या गाभारा त्याच्या लाडक्या तुळशीपत्राने भरून गेला असून रुक्मिणी मातेच्या मागे शेवंतीच्या फुलाचे पडदे करण्यात आले आहेत.
मंदिरात विविध रंगी रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्याने आज विठ्ठल भक्तांना आपल्या लाडक्या विठुरायाचे सावळे रूप आकर्षक फुल सजावटीमध्ये घेता येणार आहे.
रंगीबेरंगी सुगंधी फुलांमुळे विठ्ठल मंदिर सुवासाने दरवळून निघाले आहे .
फुलांनी केलेल्या सजावटीमुळे मंदिर अतिशय सुंदर दिसत आहे.